उष्णतेचा येलो अलर्ट असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी....नगराध्यक्षा सौ वंदनाताई वैजनाथराव बोराडे यांचे आवाहन




मंठा : नेत्रा न्यूज नेटवर्क 

 प्रशासनाने गुरुवार 16 एप्रिल ते शनिवार 18 एप्रिल या काळात जालना जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट जाहीर केला असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन मंठा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सौ वंदनाताई वैजनाथराव बोराडे यांनी केले आहे.

       कुलाबा (मुंबई) येथील प्रादेशिक हवामानशास्त्राने दिलेल्या सूचनेनुसार येत्या तीन दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे, आवश्यक काम असेल तरच डोक्यावर टोपी किंवा रुमाल वापरावा, ओल्या कपड्याने डोके, मान आणि चेहरा झाका, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविलेली लस्सी, कैरीचे पन्हे, ताक प्यावे. 

     या सोबतच नागरिकांनी अशक्तपणा, डोकेदुखी आणि सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची शक्यता गृहीत धरून अशी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये-मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा. उन्हात अतिकष्टाची कामे करू नका. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका. दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका.लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत. या सहप्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे.असे आवाहन नगराध्यक्षा सौ वंदनाताई वैजनाथराव बोराडे यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...