पाणी फाउंडेशनला समर्पित केलेल्या अधिकाऱ्यांना... "थ्री क्लॅप" आणि "फुले -फुले -फुले" देऊन प्रसार माध्यमाद्वारे रयत गटाने केले अभिनंदन.


 

:- अविनाश राठोड


समृद्ध शेतकरी करण्यासाठी देवेंद्र फडवणीस आणि आमिर खान यांची ऐतिहासिक पार्टनरशिप 


 मंठा  नेत्रा न्यूज नेटवर्क 


महाराष्ट्राचा शेतकरी हा समृद्ध होऊन आपला देश आत्मनिर्भर झाला पाहिजे या साठी 

"सत्यमेव जयते फार्मर कप" स्पर्धे २०२६ साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांची "थ्री" मुखी "संप्रेषण" ची ऐतिहासिक पार्टनरशिप झाल्यामुळे अभिनंदन, त्याचप्रमाणे 

शिर्डी येथे महाराष्ट्र शासनाच्या १२०० अधिकाऱ्यांचे समृद्ध शेतकरी आणि आत्मनिर्भर भारत करण्यासाठी पाणी फाउंडेशन ला  समर्पित पाठबळ दिल्यामुळे विशिष्ट अधिकाऱ्याचे मंठा तालुक्यातील रयत शेतकरी गटानें थ्री क्लाप आणि फुले- फुले-फुले देऊन प्रसारमाध्यमांच्या द्वारे अभिनंदन आणि स्वागत केले आहे.

शासनाचा कृषी विभाग आणि उमेद अभियान यांच्या भक्कम पाठींबा फाउंडेशनला मिळालेला आहे,गटशेती व शास्त्रशुद्ध शेतीची ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ चळवळ २०२६ ला राज्याच्या काना-कोपऱ्यात, गावा-गावांत,खेड्या-पाड्यांत पोहोचण्याचा निर्णय या "टीम थ्री मैत्रि"ने घेतला आहे.शेतकरी समृद्धीसाठी 

मा.मुख्यमंत्री,देवेंद्र फडणवीस यांचा अध्यक्षतेखाली एक अभूतपूर्व बैठक आमिर खान आणि किरण राव ई.अधिकाऱ्या समवेत झाली, त्यात अनेक निर्णय घोषित झाले आहेत.

१२०० शासन अधिकारी पुढील ४ महिने पूर्णवेळ या स्पर्धेसाठी  मार्गदर्शक म्हणून शेतकरी गटांच्या बांधणीवर काम करणार आहे.

या भव्य महाअभियानाची सुरुवात, शिर्डीतील २ दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षणाच्या रूपात झाली आहे. येथे पानी टीम,कृषी विभाग आणि उमेद अभियानाच्या ऑफिसर्सचे प्रशिक्षण घेतले आहे.

विकसित भारतासाठी या सर्व अधिकाऱ्यांना नवी उर्जा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी खास व्हिडिओ संदेशाद्वारे मार्गदर्शन करून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहे.

तसेच यात अधिकारी उत्कृष्ट कामामुळे या खास चळवळीचा भाग बनलेत,त्यांच्या सोबत पानी फाउंडेशनचे सहसंस्थापक आमिर खान व किरण राव यांनी थेट चर्चा घडली आहे.वित्त विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव व ‘फार्मर कप २०२६’ च्या उच्चस्तरीय कमिटीचे अध्यक्ष विकासचंद्र रस्तोगी (IAS) यांना परिवर्तनीय अशी दिशा दिली.कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह (IAS) यांनी ही व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांचा उत्साह वाढवला.त्याचप्रमाणे CEO उमेद अभियान श्निलेश सागर (IAS), राज्य कृषी आयुक्त सूरज मांढरे (IAS),ना.दे.कृ.सं.प्र. चे कृषीविद्या व मृदा विज्ञान विशेषज्ञ,विजय कोळेकर, ATE चंद्रा फाउंडेशनचे संस्थापक,अमित चंद्रा,सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे,अवर सचिव, उमेद अभियान,धनवंत माळी, संचालक कृषी,रफिक नाईकवाडी, CEO, पानी फाउंडेशन,सत्यजित भटकळ,पानी फाउंडेशन, प्रमुख मार्गदर्शक, डॉ.अविनाश पोळ,आदींसह शासन स्तरावरील अनेक मान्यवर मंडळीनीही या अधिकाऱ्यांनी शक्ती रुपी प्रेरणा दिली आहे.

‘समृद्ध महाराष्ट्रा’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊया असे आवाहन रयत शेतकरी गटाचे अध्यक्ष अविनाश राठोड यांनी  केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...